News Flash

‘सीपीआर झाले चकाचक’ : संत निरंकारी फौंडेशनतर्फे स्वच्छता अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संत निरंकारी मिशनद्वारे २४ फेब्रुवारी हा दिवस बाबाजीची ६४ वी जयंती म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज (शनिवार) देशातील २५o शहरांमधून ५६४ शासकीय रुग्णालयांची स्वच्छता करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरचे सी.पी. आर. रुग्णालय व परिसरामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात संत निरंकारी सेवादल व चॅरिटेबल फौंडेशनचे हजारो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेला स्वच्छाता अभियानाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सेवाभावी वृत्तीने केले जाणारे हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वच्छता अभियानामुळे माणसातील मानसिकता बदलण्यास मदत होते. तसेच या पद्धतीचे उपक्रम या फौंडेशनतर्फे वारंवार राबवावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी सी.पी.आर. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, रुग्णालयात आजार बरा होत असला, तरी परिसर स्वच्छ असेल तरच आजार बरा होण्यास मदत होते. फौंडेशनचे संचालक शहाजी पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.
या वेळी फौंडेशनचे इंचार्ज शाम लालवाणी यांनी उपस्थित सर्व संत निरंकारी सेवादलांना पर्यावरणाची शपथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. होस्पिटलमधील हृदयरोग विभाग, मॅटर्निटी विभाग, ब्लड विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, इमारतीवरील पत्रे, भिंती, पार्किंग, रुग्णालयाचे सर्व डिपार्टमेंटस इत्यादी ठिकाणी सकाळी ८ ते १२ या वेळेत स्वच्छ करण्यात आली. या अभियानात फौन्डेशनच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

One thought on “‘सीपीआर झाले चकाचक’ : संत निरंकारी फौंडेशनतर्फे स्वच्छता अभियान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!