News Flash

हलकर्णी येथे आर्थिक वादातून एकास बेदम मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे आर्थिक वादातून एकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार आज (शनिवार) सकाळी घडला. याप्रकरणी कृष्णगोंडा कलगोंडा पाटील (वय ४५, रा. हलकर्णी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण रामा पाटील, सौ. संगीता नारायण पाटील, चंदू गणपती पाटील, गणपती रामा पाटील (सर्व रा. हलकर्णी) यांचेविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णगोंडा पाटील यांनी सामाईक पाईपलाईनसाठी तसेच अन्य कारणांसाठी नारायण पाटील यांना पैसे दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी पाटील हे त्यांचे भाऊ राजू यांच्यासह नारायण पाटील यांच्या घरी आज सकाळी नऊच्या सुमारास गेले होते. या वेळी तुमचे सगळे पैसे दिले आहेत, पुन्हा का मागता, असे विचारत कृष्णगोंडा पाटील यांना वरील संशयितांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडांनी मारहाण केली. यात ते जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!