News Flash

भाजपच्या नगरच्या खासदारासह चौघांवर खंडणीचा, अपहरणाचा गुन्हा

नगर (प्रतिनिधी) : नगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचेसह चौघांविरुद्ध खंडणी, अपहरण, दहशत निर्माण करणे यासारख्या गंभीर आरोपाखाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे आज (शनिवार) दुपारी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नगरचे वाहन वितरक भूषण बिहानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याशिवाय या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवून विशेष पथकाची नियुक्ती करावी, असेही निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.
दिलीप गांधींनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान बिहानी यांच्याकडून फोर्ड एन्डेव्हर गाडी खरेदी केली होती. त्यानंतर काही दिवसांनी चॉईस नंबर आणि वाहनाच्या कार्यक्षमतेबाबत गांधी यांनी बिहानी यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. सप्टेंबर २०१५ रोजी गांधी यांचा मुलगा सुवेंद्र, सचिन गायकवाड व पवन गांधी आदींनी बिहानी यांच्याकडे सेल्समन असलेले ओस्तवाल आणि रसाळ यांचे अपहरण केले. याप्रकरणी ओस्तवाल आणि रसाळ यांना मारहाण करणे, धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याप्रकरणी बिहानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी बिहानी यांच्याकडे एसएमएस, कॉल रेकार्डिंग, व्हिडीओ फुटेज अशा पुराव्यांची मांगणी केली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे आणि पोलीस अधिक्षक मदत करीत नसल्याने बिहानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर निर्णय देताना खंडपीठाने दिलीप गांधी, मुलगा सुवेंद्र यांचेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!