News Flash

‘पीएनबी’नंतर आता ओरिएंटल बँकेत घोटाळा : सराफी कंपनीने लावला ४०० कोटींचा चुना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेला सुमारे ११५०० कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचे प्रकरण ताजे असताना आता एका सराफी व्यवसाय करणाऱ्या कंपनीने दिल्लीतील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला सुमारे ३९० कोटींचा गंडा घातल्याचे आढळून आले आहे. बँकेने याबाबत सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर सीबीआयने दिल्लीच्या करोल बागमधील द्वारकादास सेठ इंटरनॅशनलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिल्लीच्या करोल बागमध्ये द्वारकादास सेठ इंटरनॅशनल ही कंपनी डायमंड, गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग करते. या कंपनीने ओबीसीच्या ग्रेटर कैलाश सेक्टरमधील शाखेमधून २००७ मध्ये फॉरन लेटर ऑफ क्रेडिट मिळाल्यानंतर लोन घेतलं होतं. या कंपनीचे संचालक सभ्य सेठ आणि रीता सेठ हे आहेत. पंजाबी बागमध्ये हे दोघे राहतात. याशिवाय कृष्ण कुमार सिंह आणि रवी कुमार सिंह हे देखील या कंपनीशी संबंधित आहेत.
सरकारी क्षेत्रातील बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने १६ ऑगस्ट, २०१७ रोजी सीबीआयकडे द्वारका दास सेठ इंटरनेशनल विरोधात तक्रार दाखल केली आहे. लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून त्यांनी अनेक क्रेडिट सुविधांचा फायदा घेतला आहे. बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सभ्य सेठ आणि कंपनीचे इतर डायरेक्टर्स १० महिन्यांपासून घरी नाहीयेत. सभ्य सेठ देखील नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याप्रमाणे भारत सोडून पळून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!