News Flash

असळजनजीक एकाचा किरकोळ वादातून खून : तिघे जखमी

गगनबावडा (प्रतिनिधी) : असळजपैकी नाळेवाडी (ता. गगनबावडा) येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सखाराम सोनबा गावकर (वय ४२, रा. असळज पैकी रूपणीवाडी, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे. या वेळी झालेल्या तलवार आणि चाकू हल्ल्यात लक्ष्मण महादेव बांडागळे, सचिन विष्णू खेडेकर आणि प्रदीप कृष्णा खेडेकर हे जखमी झाले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.
शिवजयंतीदिनी गावात मिरवणूक सुरू असताना प्रदीप खेडेकर नि प्रकाश म्हेतर यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वेळी खेडेकरला मारहाण करण्यात आली. खेडेकर याने हा प्रकार आपले मामा सखाराम गावकर यांना सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी गावकर आणि बांडागळे शुक्रवारी म्हेतर यांच्या घरी गेले होते. या वेळी जोरदार वादावादी होऊन प्रकाश म्हेतर आणि त्याचा मुलगा आकाश यांनी सखाराम गावकर, लक्ष्मण बांडागळे, सचिन खेडेकर, प्रदीप खेडेकर यांच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले. सखाराम गावकर यांच्या वर्मी वार झाल्याने त्यांचा सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले.
याप्रकरणी प्रकाश म्हेतर (वय ४५) याला गगनबावडा पोलिसांनी अटक केली असून आकाश म्हेतर हा फरार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शहाजी दुगुळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!