News Flash

घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी): विविध राज्यात घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना २ लाख ५२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमालासह लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली. बुधाराम मियाराम चौधरी (वय ४२) व रामनिवास उग्रराम चौधरी (वय २१, दोघेही रा. रानिवाल, ता. जयतारन, जि. पाली, राजस्थान) अशी या आरोपींची नावे आहेत.
लक्ष्मीपुरी पोलिसांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात चोरट्यांनी लाल रंगाच्या दोन इंडिका गाडी वापरली असल्याचे समजले. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शोध सुरु केला. १९ फेब्रुवारी रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जैन मंदिरासमोरील संगम लॉजसमोर लाल रंगाच्या इंडिका गाडीच्या मागे एक इसम लपल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशय आल्याने पोलिस गाडीजवळ गेले. तेव्हा गाडीमध्ये एक इसम बसला असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी इंडिका गाडीची तपासणी केली असता पोलिसांना त्यामध्ये एक लोखंडी कटावणी आढळून आली. या दोघांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन आले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गायछाप तंबाखूची ५ पोती आणि इतर साहित्य असा एकूण ५२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली इंडिका गाडी ताब्यात घेतली. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!