News Flash

कोल्हापूर परिमंडलातील १३७४९ थकबाकीदारांची वीज खंडित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली शहरांसह ग्रामीण भागात वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या १३७४९ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा मागील पंधरवड्यापासून सुरु असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला. ही कारवाई सुटीच्या दिवशीही सुरु राहणार असल्याची माहिती महावितरणने पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा ९९८९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २ कोटी १२ लाख ६४ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यातील ८३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील ३७६० थकबाकीदारांचा वीजपुरवठा ८९ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून कोल्हापूर परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. २४ व २५ फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!