News Flash

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी ; अल्पवयीन मुलीची चौकशी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात निलंबीत डीवायएसपीच्या मुलीने घरकामासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलावर तब्बल पाच वर्षे लैगिंक अत्याचार केल्याची घटना काल (गुरूवार) उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलीला शाहुपूरी पोलीसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, सन २०१२ पासून १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत निलंबीत डीवायएसपीच्या मुलीने पिडीत मुलावर शारिरीक मानसिक अत्याचार करून त्याला जिन्यावरून खाली ढकलून त्याच्या शरिरावर तसच लैगिंक अवयवांवर चटके दिल्याची फिर्याद पिडीताच्या आईने दिली आहे. पिडीत मुलाकडून स्वच्छतेचे आणि घर आवरण्याचे कामही या मुलाकडुन करून घेतल्याचे म्हटंले आहे. शिवाय पिडीत मुलाला त्याच्या आईला भेटू देत नव्हते आणि त्याला कोणत्याही शाळेत दाखल केले नव्हते.

याबाबतची तक्रार फिर्यादिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आज संशयीत आरोपी निलंबीत डीवायएसपीच्या मुलीला शाहूपूरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर निलंबीत डीवायएसपी आणि त्याची पत्नी अद्याप फरार आहेत. हा गुन्हा निलंबीत डीवायएसपी त्यांची अल्पवयीन मुलगी आणि पत्नी यांच्या संगनमताने केले असल्याची शंका पोलीसांना आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलीस सर्व अंगाने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!