News Flash

पीएनबी घोटाळा : गीतांजली ज्वेल्सच्या कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन…

मुंबई (प्रतिनधी) : पीएनबी बँक घोटाळ्या संदर्भात ईडी आणि सीबीआयकडून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कार्यालयांवर छापे टाकून कारवाई केल्यानंतर आता मेहुल चोक्सी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

गीतांजली ज्वेल्स लिमिटेडच्या जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी अंधेरी एमआयडीसीमधल्या गीतांजली ज्वेल्सच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. नीरव मोदीनं केलेल्या अपहाराप्रकरणी ईडीने नीरव मोदीच्या कंपनीच्या नावे असलेली खाती गोठवली आहेत. यामध्ये सध्या तीस कोटींची शिल्लक आहे. तसंच जवळपास १४ कोटी किंमतीचे शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत.

या शोध मोहिमेदरम्यान ईडीनं स्टीलची १७६ कपाटे आणि परदेशी घड्याळेही जप्त केली आहेत. मुंबई, दिल्ली, अलिबाग, सुरत, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यामध्ये ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!