News Flash

डीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने २६ फेब्रुवारीला आझाद मैदानावर एल्गार आंदोलन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील लाखो युवक-युवती डीएड, बीएड पदवी घेऊनही नोकरीपासून वंचित आहेत. राज्य शासनाने यापूर्वी ४ वेळा शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. तसेच गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शिक्षक अभियोग्यता चाचणी ही ऑनलाईन परीक्षा घेतली. ही परीक्षा होऊनही शिक्षण भरतीबाबत अजून कोणतीही कार्यवाही शासनस्तरावर झालेली नाही. याकरिता डीएड, बीएड जनकंदज असोशिएशनच्या वतीने २६ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आझाद मैदान येथे बेमूदत यल्गार सत्याग्रह आयोजित करण्यात आला असल्याचे स्टु़डंट असोसिएशनचे राज्य कार्यकारणीचे सचिव राजेंद्र उदाळे यांनी आज (शुक्रवार) आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उदाळे म्हणाले की, शासनाचा निर्णय दि. २३ जून २०१७ च्या निर्णयानुसार २४ हजार रिक्त शिक्षक भरतीची पदे केंद्रीय पध्दतीने कार्यवाही करावी. तसेच खाजगी संस्थेतील शिक्षक भरती अभियोग्यता गुणानुक्रमाने करून राज्य शासनाच्या जिल्हा पातळीवरील सर्व जागा त्वरीत भरण्यात यावीत. महाराष्ट्रातील १,३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. सन २०१२ नंतर खाजगी शिक्षण संस्थेतील सुमारे ६,७०० बेकायदेशीर शिक्षक भरती रद्द करावी, यासह अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई या ठिकाणी बेमुदत एल्गार सत्याग्रह करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

दरम्यान विधानसभेतील विरूध्द पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत येत्या अधिवेशन काळात आवाज उठवून तरूणांना न्याय मिळवून देण्याचे भूमिका घेतीली आहे. शिवाय सुप्रिया सुळे यांनी सुध्दा शिक्षण भरती प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा आझाद मैदान येथील सत्याग्रह अंदोलनात मी स्वतः सहभागी होईल असा इशारा पत्राव्दारे मुख्यमंत्र्यांना दिला असल्याचे स्टुडंट असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुयश उदाळे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे भुषण मिटके, सागर जाधव, प्रज्ञा माळकर, कृष्णात उदाळे, रघुनाथ कुंभार, संजय हाजगुळकर, दत्ता पालकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!