News Flash

लालूप्रसाद यांना जामीन नाहीच…

रांची (वृत्तसंस्था) : चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यादवांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळला. सीबीआय कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना देवघर खजिन्याशी संबंधित चारा घोटाळ्यात दोषी ठरवत साडेतीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २३ डिसेंबर २०१७ पासून ते तुरुंगात आहेत. याखेरीज आणखी दोन घोटाळ्यांमध्येही ते दोषी आढळले असून त्यांना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण सहा चारा घोटाळ्यांमध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून अन्य प्रकरणी कोर्टांमध्ये सुनावणी शिल्लक आहे.
लालू प्रसाद यादवांवर चारा घोटाळाप्रकरणी तीन खटले दाखल झाले होते. त्या तिनही प्रकरणी त्यांना २०१३, २०१७ व २०१८ मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि अनुक्रमे पाच, साडेतीन व पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. देवघर खजिन्यातून १९९१ ते १९९४ या कालावधीत ८९.२७ लाख रुपये बेकायदेशीररीत्या काढल्याचा आरोप सिद्ध झाला आणि चारा घोटाळाप्रकरणी सहभागाबद्दल त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. सध्या रांचीमधील बिरसा मुंडा जेलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख असलेल्या लालूप्रसादना ठेवण्यात आले आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा करत त्यांनी या शिक्षेविरोधात दादही मागितली आहे तसेच जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र झारखंड उच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!