News Flash

अतिक्रमण, वैद्यकीय शुल्कावर स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका स्थायी समिती सभा आज (शुक्रवार) पार पडली. यावेळी शहरातील रस्ते, कचरा, अनधिकृत बांधकाम, ड्रेनेजाची अपुरी कामे, शहरातील ठिक-ठिकाणी होणारी पाणी गळती, वैद्यकिय सेवाशुल्काट वाढ करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच महापालिका शहरातील नागरिकांना सेवा सुविधा देण्यात कमी पडत असून त्याबाबत योग्यतो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

यावेळी नगरसेविका सविता घोरपडे आणि स्थायी सभापती आशिष ढवळे म्हणाले की, वैद्यकिय सेवाशुल्कामध्ये वाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये प्रसुतीसाठी जी फी आकारण्यात येते त्यामध्ये जर पहिली मुलगी झाली तर मोफत प्रसुती करण्यात यावी. तसेच दुसऱ्या मुलीवेळीही प्रसुती मोफत करण्यात यावी, असे मत त्यांनी मांडले.

तसेच तावडे हॉटेल तावडे हॉटेल येथील जागेचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्याबद्दल परिसरातील अतिक्रमीत बांधकामावर काय कारवाई होणार यावर चर्चा झाली. यावेळी दीपा मुगदूम म्हणाल्या की, तेथील मिळकतधारकांकडून मिळकत अस्तित्वात आल्यापासून घरफाळा, परवाना व इतर प्रकारच्या वसुली करा. तसेच तनवाणी हॉटेलवर देखील काय कारवाई करणार का ? असा सवाल त्यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केला.

स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी गाडी अड्डयांवरील अतिक्रमण काढणेबाबत आठच दिवसापूर्वी चर्चा केली होती. यावेळी आज पाहणी केली असता ती जागा अजून खाली केली गेलेली नाही. यावेळी ही जागा 1 मार्च पर्यंत जागा खाली करुन घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रशासनाने लवकरच कारवाई करू, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!