News Flash

कोल्हापुर जिल्हा भोई समाजाच्या विविध प्रश्नांसाठी रविवारी बैठकीचे आयोजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा भोई समाज्याच्या वतीने रविवार (दि.२५) श्री.शहाजी छ. महाविद्यालय दसरा चौक येथे दुपारी १ वाजता समाजातील विविध प्रश्नावर्ती चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत समाजाच्या आरक्षणाची पुढील दिशा ठरविणे, भोई सामाजाचे अधिवेशन घेणे किंवा पश्चिम विभागीय मेळावा घेणे, कोल्हापूरमध्ये भोई समाजाची स्वतंत्र उइमरत उभी करणे, समाज्याच्या मत्स्य व्यवसाय या पारंपारिक व्यवसायामधील येणाऱ्या अडी-अडचणींवर चर्चा करणे, क्रिमिलेअर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि स्कॉलरशिप बाबत असणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करणे.

तसेच जातीच्या दाखल्या संधार्बत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विचार विनिमय करणे, तसेच ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या समाजाच्या विविध प्रश्नावरती चर्चा करून समाज्याच्या वाटचालीची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती भोई समाज्याचे अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर आणि सेक्रेटरी नामदेव तिकोणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!