News Flash

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे उद्यापासून हॉस्पिकॉन २०१८ परिषद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हॉस्पिकॉन २०१८ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात असून या परिषदेला उद्या (शनिवार) पासून रेसिडेन्सी क्लब येथे सुरुवात होणार आहे.

या परिषदेत डॉक्टरांना रुग्णांचे योग्य निदान करुन उपचार करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो ? कोणती नैतिक बंधने पाळावी लागतात ? कोणत्या समस्या डॉक्टरांना उद्भवतात ? या विषयी समाज अनभिज्ञ आहे. यासर्व विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र, वैद्यकीय कचरा निर्मूलन, वैद्यकिय जल आणि प्रदूषण व्यवस्थापन, इन्फेक्शन कंट्रोल, हॉस्पिटल सेवा, वैद्यकीय परवाने या गोष्टीची माहिती कोणत्याही मेडिकल कॉलेजमधून दिली जात नाही. त्यातच वैद्यकीय कायदे, न्याय वैद्यकीय संदर्भ, ग्राहक कायदे याबाबत जागरूक राहावी. या उद्देशाने असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय परीषदेचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.

One thought on “कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे उद्यापासून हॉस्पिकॉन २०१८ परिषद…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!