News Flash

चितळे परिसरातील उपसाबंदी रद्द करा : ग्रामस्थांची मागणी

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील जेऊर, भावेवाडी, चाफवडे या गावातील ग्रामस्थांची उपसाबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ही अन्यायकारक उपसाबंदी रद्द करण्याची मागणी चितळे परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदारांना आज (शुक्रवार) निवेदन देऊन केली आहे.

या उपसाबंदीचा कार्यक्षेत्रामध्ये सरकारी माध्यमातून कोणत्याही प्रकारचा सिंचन तलाव अथवा धरणाचा फायदा होत नाही. स्वः मालकीच्या विहिरी आणि उभारलेल्या सिंचन सुविधांच्या आदेशामुळे पाण्याचा वापर करू शकत नाही. त्यामुळे पीक धोक्यात आले आहेत. ही अन्यायकारक उपसाबंदी ताबडतोब स्थगित करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी इथल्या ग्रामस्थांनी दिला. यावेळी सरपंच मारुती चव्हाण, जयवंत सरदेसाई, संजय सांबरेकर, प्रकाश तर्डेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!