News Flash

दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा समाजाला प्रेरणा देणारी : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया क्रिकेट असोशियशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड, महाराष्ट्र क्रिकेट असोसिशयन फॉर डिसेबल्ड, पुणे, शाहुपूरी जिमखाना कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला आज (शुक्रवार) सुरुवात झाली. तसेच ही स्पर्धा समाजाला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शाहूपुरी जिमखाना आणि शिवाजी युनिव्हर्ससिटी येथील मैदानात होत असलेल्या तीन दिवसीय दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खा. धनंजय महाडिक, ऑल इंडिया क्रिकेट असोशिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्डचे अध्यक्ष, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, उमेश कुलकर्णी, अशोक वाडेकर, विनायक गोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एखादी शारिरीक उणीव असतांनासुध्दा अशा उणीवांवर मात करुन माणसे यशस्वी होतात. हे खूप आनंददायी आहे. असे सांगून दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धांमधून संपूर्ण समाजाला सकारत्मक प्रेरणा तसेच उर्जा मिळणार असल्याचे सांगितले.

तर अजित वाडेकर म्हणाले की, क्रिकेटर चंदू बोर्डे हे आपले अत्यंत जवळचे मित्र असून कोल्हापूर हे त्यांचे सासर असल्याने त्यांच्यामुळेही कोल्हापूरबद्दल प्रेम व आस्था आहे. भारतात क्रिकेट हा खेळ गल्लीबोळात खेळला जातो. यामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राने अनेक मोठ-मोठे क्रिकेटर्स देशाला दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचे या खेळावर प्रेम आहेच पण त्याबरोबरच सरकारही खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.

या स्पर्धा तीन दिवस चालणार असून यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मुंबई, सौराष्ट्र, बडोदा असे पाच संघ सहभागी झाले आहेत. असून या संघामध्ये दहा सामने खेळविले जातील. विजयी होणाऱ्या खेळाडूंना पश्चिम विभागीय संघात स्थान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!