News Flash

हुपरीच्या चांदी व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करु : पूनम महाजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हुपरीच्या चांदी व्यावसायिकांची सुरक्षा आणि त्यांना येणा-या अडचणींची दखल घेणार आहोत. तसेच आपण केंद्र शासनातर्फे चांदी व्यावसायिकांना विशेष सहकार्य करणार असल्याचे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, खा. पूनम महाजन यांनी व्यक्त केले. त्या भाजपाच्या युवा मोर्चाने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमावेळी बोलत होत्या.

इचलकंरजी विधानसभा भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने युवा उद्योजक, युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी युवा उद्योजकांना प्रेरणा आणि पाठबळ मिळण्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी महावीर गाट फौंडेशनचे अध्यक्ष अमित महावीर गाट यांना युवा उद्योजक हा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. दरम्यान अमित गाट यांनी हुपरीच्या चांदी व्यवसायातील अडीअडचणीं आणि त्यांच्या सुरक्षिते विषयीचे निवेदन खा. पूनम महाजन यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!