News Flash

सीपीआरमध्ये २ डी इको, हृदयरोग तपासणी शिबीरास प्रारंभ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक आणि धर्मादाय सह-आयुक्त, कोल्हापूर तसेच एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबई यांच्या सुयुक्त विद्यमाने 2 डी इको आणि हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन आज (शुक्रवार) करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ महसूल मंत्री, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी धर्मादाय सह. आयुक्त निवेदिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या शिबीरामध्ये तपासणी झालेल्या बालकांवर लवकरात लवकर मुंबई येथे शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आपल्या कामांना नवऊर्जा देणा-या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवून समाजाबरोबर असणारे नाते घट्ट करणार असल्याचे ते म्हणाले.

तर स्व.दिग्वीजय खानविलकरांच्या नंतर सीपीआर अद्यायावत करण्याची जबाबदारी चंद्रकांतदादांनी उचलली असल्याचे, मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहा. कक्षप्रमुख आणि विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस.पाटील, सी.पी.आरचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, सहा.धर्मादाय आयुक्त आर.जी.चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!