News Flash

नाना पटोले यांना राहुल गांधींकडून प्रदेश उपाध्यक्षपदाचे बक्षीस…

भंडारा (प्रतिनिधी) : सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवून अखेर काँग्रेसमध्ये परतलेल्या नाना पटोले यांना प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाचे बक्षीस देण्यात आले आहे. आज (शनिवार) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटोले यांची त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
मागील महिन्यात नाना पटोले यांनी मोदी आणि फडणवीस सरकारविरोधात कडाडून टीका करीत खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्थात, त्यांना काँग्रेस संस्कृती नवी नाहीये. ते यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. मागील निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पटोले यांना काँग्रेसमध्ये मानाचे स्थान दिल्याने भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!