News Flash

माझ्या जेवणात विष घालण्याचा प्रयत्न : तेजस्वी यादव यांचा नितीशकुमार सरकारवर आरोप

पाटणा (वृत्तसंस्था) : लालूप्रसाद यादव यांच्या मुलांनी नितीशकुमार यांचेवर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरु केली आहे. तेजप्रताप यादव यांनी मी सरकारी बंगला लवकर सोडावा म्हणून नितीशकुमार यांनी त्या बंगल्यात भूत सोडले होते, असा हास्यास्पद आरोप केला होता. त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काल आरोप केला आहे की, नितीशकुमार यांनी मला अन्नात विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिहारचे राजकारण खालच्या पातळीवर येऊन पोचले आहे, याची प्रचिती जनतेला येत आहे.
गुरुवारी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले की, नितीशकुमार सरकार माझे फोन टॅप तर करीत आहेच, पण त्याचबरोबर माझ्या खाण्यापिण्याच्या पदार्थांत विषारी आणि अमली पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केले जातात. मी ज्या सरकारी विश्रामधामामध्ये जातो, जिथे सभा घेतो त्या स्थळापर्यंत माझा पाठलाग केला जातो, माझ्या हालचालींवर नजर ठेवली जाते. या आरोपांनी बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर संयुक्त जनता या आरोपांचा समाचार घेतला आहे. प्रवक्त्याने म्हटले की, बिहारमध्ये आता तेजस्वी यादव यांची लोकप्रियता घटली असल्याने अशा प्रकारचे निराधार आरोप करून जनतेचे लक्ष वेधण्याचा यादव यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!