News Flash

शिवाजी पूल अपघातग्रस्त कुटुंबीयांचा कोल्हापूरकरांच्या माणुसकीला अनोखा सलाम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : २६ जानेवारी रोजी गणपतीपुळेहून पुणेकडे जाताना कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात होताच कोल्हापुरातील अनेक नागरिकांनी धाव घेऊन रात्रीच्या अंधारात प्रसंगी आपली जीवाची पर्वा न करता मदत केली. यामुळे काही प्रवाशांचे प्राण वाचले.
सर्व अपघातग्रस्त पुण्यातील होते. कोल्हापूरकरांच्या या सहृदयतेपोटी आपली कृतज्ञता व्यक्त करताना या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरखडे, केदारी, नांगरे परिवारांतील इतर सदस्यांनी ‘कोल्हापूरकरांना सलाम’ अशा आशयाचा फलक आज (गुरुवार) शिवाजी पुलावर लावला. कोल्हापूरकरांच्या माणुसकीच्या भावनेचे वर्णन करण्यास शब्द तोकडे आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!