News Flash

भाजप-शिवसेनेत संवाद आहेच, युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील : खा. पूनम महाजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप – शिवसेना यांच्यातील युतीत संवाद सुरू आहे. ती युती तुटलेली नाही. युती करण्याबाबत दोन्हीकडील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, खासदार पूनम महाजन यांनी येथे आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार पूनम महाजन यांचे आज करवीर नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. ताराराणी पुतळा येथून त्यांच्यासमवेत रॅली काढण्यात आली. या वेळी त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराबद्दल महाजन यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढीस आहेत. त्या पूर्ण करणे हे आव्हान आहे, पण आमचे सरकार बॅकफूटवर गेले आहे असे कोणत्याही संवादातून माझ्यासमोर आलेले नाही. ही सरकारच्या कामगिरीची सकारात्मक बाजू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (बुधवार) मुलाखतीत प्रश्न उपस्थित केला होता. मोदींचे काम चांगले आहे पण त्यांच्यासोबत सक्षम अशी लोक नाहीत, अशी टीका केली होती. त्यावर महाजन म्हणाल्या की, भारतीय क्रिकेट संघ जेव्हा सामना जिंकतो तेव्हा चर्चा होते ती सांघिक कामगिरीऐवजी विराटच्या खेळीची. आमच्याही कर्णधाराची धुवाधार फलंदाजी सुरू आहे. भाजप व सरकारमध्येही सांघिक मेळ उत्तम प्रकारचा असल्याने पवारांनी काळजी करण्याची गरज नाही. मागील काँग्रेस आघाडीच्या काळात निर्णय रिमोट कंट्रोलने होत होते, असे म्हणत त्यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला.
आमदार योगेश टिळक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, राहूल चिकोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!