News Flash

जिल्हा परिषदेतर्फे श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सूरु…

कोल्हापूर (संदीप बिडकर) : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यामध्ये भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. नागपूरच्या वेट फॉर अॅनिमल्स् या संस्थेच्या वतीने सध्या जिल्ह्यात ही मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती जि.प.चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी आज (गुरुवार) दिली.

वेट फॉर अॅनिमल्स् या संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या या मोहिमेत अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे पायलट पातळीवर हा प्रयोग राबवण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सकाळी पाच ते सहा या वेळेत श्वानांना पकडले जाते. दिवसभरात बटरफ्लाय जाळीमध्ये २५ ते ३० श्वान पकडले जातात. त्यानंतर त्यांना बेशुद्ध केले जाते. नसबंदी करण्यासाठी श्वानाचे किमान पाच ते सात किलो वजन असावे लागते. नर श्वानाचे अंडकोष काढले जातात. तर मादी श्वानाचे गर्भाशयाची पिशवी काढली जाते. अशी माहीती वेट फॉर अॅनिमलचे डॉ.ढालाईत यांनी दिली.

यामध्ये प्रामुख्याने श्वानांची वाढ होऊ नये, तसेच ते समाजाला घातक ठरु नयेत. यासाठी ही मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. आत्तापर्यंत अब्दुललाट येथे १५६ श्वानांवर ही नसबंदी केली आहे. तसेच नृसिंहवाडी आणि गड मुडशिंगी येथे ही मोहीम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!