News Flash

मुगळी येथे ट्रॅक्सच्या धडकेत युवकाचा मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे ट्रॅक्सने मागून धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. उदय दत्तात्रय गुरव (वय ३०, रा. मुगळी) असे त्याचे नाव असून तो विमा एजंट होता. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी नऊच्या सुमारास घडला.
उदय आज सकाळी आठच्या सुमारास शेताकडे गेला होता. नऊच्या सुमारास घरी परतत असताना गडहिंग्लजकडे जाणाऱ्या ट्रॅक्सने (एमएच – ४५ ए ७८५६) जोराची धड़क दिली. गडहिंग्लज येथील खाजगी हॉस्पिटलला आणण्यात आले, पण तेथून पुढील उपचाराकरिता कोल्हापूरकड़े घेऊन जात असताना निपाणी येथे गाडीमध्येच त्याचा मृत्यू झाला. सहायक फौजदार खंडेराव कोळी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!