News Flash

मुत्नाळ येथे दोन मटका एजंटांना अटक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथून दोन मटका एजंटांना अटक करण्यात आली. आप्पासाहेब गणपती कोळी (वय २३) चांदसाहेब हमीद किल्लेदार (४५, दोघेही रा. मुत्नाळ) अशी त्यांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी ग्रामसभेत गावातील अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करण्यात आला होता. आज (गुरुवार) आप्पासाहेब कोळी आणि चांदसाहेब किल्लेदार हे मोबाईलवर मटका घेत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. काही ग्रामस्थांनी आज दुपारी एकच्या सुमारास चाळोबा मंदिराजवळ आप्पासाहेब कोळी आणि चांदसाहेब किल्लेदार यांना पकडून गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि साहित्य जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!