News Flash

पंतप्रधानांनी ‘मौन’ सोडावे : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएनबी बँकेतील घोटाळा, राफेल सौदा आणि नीरव मोदी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यांना काय वाटते हे ‘मन की बात’मधून ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पंतप्रधानांनी मौन सोडावे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यावेळी राहूल गांधी म्हणाले की, मोदीजी गेल्या महिन्यात तुम्ही माझ्या सल्ल्याकडे कानाडोळा केला. सध्या लोकांना तुमच्याकडून काय ऐकायला आवडेल हे माहितेय ?,नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले आणि त्याने पलायन कसे केले ?,५८ हजार कोटी रुपयांचा राफेल सौदा यावर तुम्ही बोलले पाहिजे. दागिन्यांचा व्यापारी नीरव मोदीने बँकेला कोट्यवधींचा चुना लावून तो फरार झाला आहे. त्याला सत्तेवर असलेल्यांनीच संरक्षण दिले आहे. यावर पंतप्रधानांनी बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजीच्या मन की बातसाठी मी तुम्हाला देशातील अत्याचार थांबवणे, डोकलाममधून चिनींना बाहेर काढणे, रोजगार या विषयावर बोलण्याचे आवाहन केले होते, पण तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही, असे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोंदीवर आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!