News Flash

कोल्हापुरातील वनौषधी विद्यापीठ, वेदिक फाउंडेशनतर्फे काठमांडूत ९ एप्रिलला आयुर्वेद परिषद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वनौषधी विद्यापीठ संस्था, कोल्हापूर,महर्षी वेदीक फौन्डेशन नेपाळ आणि सर्बियन असोसिएशन आयुर्वेद, युरोप यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू नेपाळमध्ये ९ एप्रिलला १२ व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, वनऔषधे, निसर्गोपचार, पर्यायी उपचार पध्दतीवरील विविध प्रकारे संशोधन करणा-या संशोधकांचा सहभाग असल्याची, माहीती कोल्हापूर वनौषधी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.एस.बी.पाटील यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ.पाटील म्हणाले की, ही १२ वी ‘पॅनासिआ’ इंटरनॅशल कॉन्फरन्स ऑन आयुर्वेद अँड होलिस्टिक हिलींग २९१८ या नावाने संपन्न होणा-या या परिषदेत आयुर्वेदिक वैद्य, डॉक्टर्स, वैद्यक व्यवसायी, संशोधक, चिकित्सक, योग तज्ञ, होमिओपॅथी तज्ञ आदी या परिषदेमध्ये विविध शास्त्रीय परिसंवादातून आपले संशोधनपर प्रबंध सादर करणार आहेत. तसेच तज्ञ अनुभवी संशोधक, अध्यापक आपले संशोधनात्मक विचार मांडणार आहेत.

या परिषदेमध्ये अमेरिका, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, फ्रान्स, सर्बिया, मलेशिया, दुबई यांच्यासह भारतातील विविध राज्यातील आयुर्वेद वैद्यक संशोधन प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिषदेचे संयोजन सचिव डॉ.ऋषिकेष जाधव, डॉ.आदित्य काशिद, नामदेवराव कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!