News Flash

जुन्या नोटा फाडून, जाळून टाकून तोटा जाहीर करा : शरद पवार

जुन्या नोटा फाडून, जाळून टाकून तोटा जाहीर करा : शरद पवार
पुणे (प्रतिनिधी) : सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा आता चलनात नाहीत. त्यामुळे त्या नोटा फाडा, जाळून टाका, असे पत्र रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह ८ बँकांना दिले असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केला. काल (बुधवार) पुण्याच्या बीएमसीसी मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे पवार यांनी या वेळी रिझर्व्ह बँकेच्या या आदेशाची प्रतच राज ठाकरे यांचे समोर सदर केली.
नोटाबंदीबाबत राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला असता पवार यांनी हा धक्कादायक दावा केला. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना त्यांच्याकडील चलनातून रद्द झालेल्या ५०० आणि १००० च्या नोटा जमा करण्यास मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकांकडे कोट्यवधींच्या नोटा पडूनच राहिल्या. या नोटा स्वीकारण्यास आरबीआयने नकार दिला. शरद पवार यांनी सांगितले की, मी हा प्रश्न तीन वेळा संसदेत उपस्थित केला, मात्र सरकारकडून त्याला उत्तर देण्यात आले नाही. मी पुन्हा हा प्रश्न विचारल्यानंतर मला रिझर्व्ह बँकेच्या एका पत्राची प्रत दिली. त्यात म्हटले आहे की, जिल्हा बँकांनी या नोटा आता फाडाव्यात, जाळून टाकाव्यात. आणि नष्ट केलेल्या नोटांच्या किंमत आपल्या नफा-तोटा पत्रकात ‘तोटा’ म्हणून दाखवावी. याबाबत पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!