News Flash

आता बॉलीवूडमध्ये पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे शेपूट सरळ होत नसल्याने बॉलीवूड निर्मात्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये चित्रपट आणि मालिका निर्मात्यांच्या परिषदेची एक बैठक पार पडली, या बैठकीमध्ये चित्रपट निर्माता वासू भगनानी आणि गायक बाबूल सुप्रियो यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला, अशी मागणी पुन्हा एकदा लावून धरली. या मागणीनंतर निर्मात्यांच्या परिषदेने या कलाकारांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

यावेळी वासू भगनानी यांनी सांगितले की, पाकिस्तानी कलाकारांना कमीत कमी २ वर्ष बॉलीवूडमध्ये बंदी घातली पाहीजे. भाजपचे खासदार असलेले गायक बाबुल सुप्रियो म्हणाले की, या पत्रकार परिषदेत माझी मते मांडल्याबद्दल पक्षातून मला जाब विचारला जाऊ शकतो, मात्र मी माझी मते इथे स्पष्टपणे मांडणार आहे. ते म्हणाले की पाकिस्तानी कलाकारांना बंदी घातली तर आपल्या सैनिकांचे मनोबल वाढेल आणि त्यांनाही वाटेल की बॉलीवूड त्यांच्या पाठीशी असून पाकिस्तानी कलाकारांविरोधात ही इंडस्ट्री पावले उचलीत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!