News Flash

चिंता करू नका, मोबाईल नंबर १० अंकीच राहणार..!

मुंबई (प्रतिनिधी) : मोबाईलचा नंबर १३ अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावरच्या बातम्या ही प्रसारित झाल्या होत्या. या प्रकारामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्र. बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक १० अंकीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दूरसंचार मंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये मशिन टू मशिन (एम२एम) मोबाईल नंबर १० वरून १३ अंकी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आपल्या मोबाईलचा नंबरही बदलणार असा समाज पसरला होता. परंतु, सामान्य मोबाईल क्रमांक आणि एम२एम नंबर्समध्ये फरक असतो. एम२एम मोबाईल नंबर हे स्वाईप मशिन्स, कार, वीजेची मीटर्स यांसारख्या उपकरणांसाठी वापरले जातात. त्यामुळे हा बदल सामान्य ग्राहकांसाठी नसेल असे भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!