News Flash

लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने मिग-२१ लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली. १९ फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतले आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केले. त्यामुळे अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

जगभरात असे निवडक देश आहेत जिथे महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारतात ऑक्टोबर २०१५ ला केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी २०१६ मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात नियुक्ती केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!