News Flash

शिवाजी पूल एसटी आणि केएमटीसाठी खुला : पोलीस प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील महिन्यात मिनी बस शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत कोसळून १३ जणांना प्राण गमवावे लागले होते. या अपघातानंतर भार तपासणीच्या निमित्ताने पूल तातडीने अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याचा फटका सर्व प्रवाशांबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला होता. आज बारावीच्या परिक्षेसाठी कोल्हापुरात येणा-या विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोयीचा विचार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या परवानगीने शिवाजी पूल हा एसटी आणि केएमटीच्या वाहतूकीसाठी उद्या (गुरुवार) पासून सुरु करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

आजपासून (बुधवार) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिवाजी पुलाच्या पलीकडील बाजूला असलेल्या गावांतील नागरिकांना आपल्या पाल्यांना आज दुचाकीवरून कोल्हापूरमधील महाविद्यालयात परीक्षेसाठी सोडायला येणे भाग पडत होते. प्रशासनाने हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणीची दखल घेत हा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!