News Flash

‘दोन’ सख्ख्या भावांनी केली बनाचीवाडी डिजीटल ग्रामपंचायत…

राधानगरी (प्रतिनिधी) : बनाचीवाडी (ता.राधानगरी) ग्रामपंचायत दक्षिण महाराष्ट्र आणि कोल्हापुर जिल्ह्यात डिजिटल ऑन लाइन तक्रार निवारण आणि घरबसल्या नागरिकांच्या संबधित सर्व प्रकारचे दाखले देणारी ग्रामीण भागातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

मेकॅनिकल इंजीनिअर करीत असलेल्या विशाल घोलकर आणि निखिल घोलकर या दोन भावांनी मिळून तयार केलेल्या सॉफ्टवेअर आणि अॅपचे उद्घाटन सभापती दिलीप कांबळे सरपंच रेश्मा पाटील यांच्या हस्ते झाले. या अॅपमध्ये गावाची संपूर्ण माहिती संकलित केली गेली आहे. हे सॉफ्टवेअर आणि अॅप तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. या अॅपमुळे नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीकडून आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, मिळकतीचे उतारे मिळण्यास सुरवात झाली आहे.

तसेच ग्रामपंचयती कडून मिळणाऱ्या सुविधा बाबत असणाऱ्या तक्रारी यद्वारे नोंद करता येणार आहेत. अवघी १८०० लोकसंख़्या असलेली ही छोटी ग्रामपंचायत अशा प्रकारची सुविधा देणारी तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे गावातील नागरिकाना ग्रामपंचायतमध्ये न जाता ही आपली कामे घरबसल्या मार्गी लावता येणार आहेत.

यावेळी उपसरपंच बाळासो नरसाळे, जयवंत पताड़े, रघुनाथ परीट, अनिता वंजारे, शोभा धनवड़े, सीताबाई कोंडवळ, सारिका परिट, जयश्री काशिद उमेश जाधव, ग्रामसेवक महेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!