News Flash

कोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प उभारणार…

मुंबई (प्रतिनिधी) : मॅग्नेटिक महाराष्ट्र या संकल्पनेतून रत्नागिरी रिफायनरीखेरीज, नागपूरलाही एक नवा पेट्रोलियम प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोकण आणि विदर्भात आणखी एका मोठा प्रकल्पामुळे तेथील औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

नागपूर आणि पूर्व विदर्भाला पेट्रोलियम पुरवठा करणाऱ्या विद्यमान खापरी टर्मिनलऐवजी नागपूरनजिकच बोरखेडी येथे एक नवीन टर्मिनल उभारण्यात येईल. हे टर्मिनल उभारण्यासाठी ५०० कोटींचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासन व आयओटी इन्फ्रास्ट्रक्चर व एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड दरम्यान होणार आहे.
नवीन टर्मिनल इंडियन ऑइल व हिंदुस्तान पेट्रोलियम दोघांसाठी सामायिक सेवा पुरवेल, व वाढीव क्षमतेचे असेल. वर्षाला सुमारे 1.4 दशलक्ष किलोलिटर पेट्रोलियमची उलाढाल नवीन टर्मिनलवरून होईल. मालगाडीद्वारे तेलाची आवक आणि टँकरद्वारे वाटप अशी सोय येथे असेल. याचा फायदा नागपूरखेरीज भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!