News Flash

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात…

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणात आज (बुधवार) फागपंचमी पारंपारिक ह्या लोकोत्सवाला सुरुवात झाली. फागपंचमीपासून कोकणात होळी उत्सवात आनंदाला उधाण येते. आजपासून कोकणातल्या पारंपारिक शिमगोत्सवाला सुरवात झालीय. कोकणात फागपंचमीला शेवरीच्या झाडाची होळी आणण्याची प्रथा आहे. होळीसाठी गावाजवळच्या जंगलातून शेवरीच्या झाडाची निवड केली जाते. त्यानंतर फागपंचमीला ही होळी आणण्यासाठी बालगोपाल आणि वाडीतली सर्व मंडळी जमून ढोल-ताशांचा गजरात हा शिमगोत्सवाला सुरुवात होते.

यावेळी होळी तोडण्याची प्रथा आहे. ही होळी तोडताना नारळ आणि पानाचा मानाचा विडा होळीच्या झाडाच्या बाजूला ठेवला जातो. हा मान मानकऱ्याचा असतो. होळी तोडण्यापूर्वी गा-हाणे घातले जाते. यानंतर लगबग सुरु होते ती शिरव या झाडाच्या होळी तोडण्याची. गावातल्या प्रत्येक जातीला इथं मान असतो.

ही होळी तोडण्यासाठी त्या ठिकाणची साफ सफाई केली जाते. होळी तोडून एका बाजूला पाडली जाते. आणि त्या ठिकाणाहून तोडलेले शिरवाचे झाड उचलून आणले जाते. येथील सर्व मंडळी फाकांच्या माध्यमातून ही होळी आपल्या वाडीपर्यत घेवून येतात. गावकरी हातातून होळी नुसती आणत नाहीत, तर ती हवेत उडवत आणतात. तिची विधिवत पुजा केली जाते. आणि गावागावातून वाड्या वस्तीतून शेवरीच्या होळ्या उभ्या रहातात.

शेवरीच्या या छोट्या होळीने या सणाची सुरुवात होते. यानंतर माड, पोफळ, आंबा अशा झाडांची मुख्य होळी उभी केली जाते. आणि त्यानंतर भद्रा पोर्णिमेला मुख्य होम केला जातो. गौरी गणपतीनंतर कोकणात मोठा सण असतो तो शिमग्याचा. त्यामुळे या शिमगोत्सवासाठी कोकण गजबजू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!