News Flash

गिजवणेत ‘सोने पॉलिश’ करण्याच्या बहाण्याने साडेचार तोळे सोने लंपास…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे सोने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याची चोरी करून चोर गायब झाले. मागच्याच आठवड्यात गिजवणे येथे बाईक वरून दीड लाखांचा ऐवज चोरी केला होता. तर आज (बुधवार) दुपारी बाराच्या सुमारास चोरट्यांनी महिलांना फसवून सोने घेऊन पलायन केले आहे. त्यामुळे गिजवणेसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गिजवणे येथील तुकाराम बाबू कांबळे (वय ५२) यांच्या घरी अंदाजे २५ ते ३० वयोगटातील दोन युवक ऊजाला शाईन पॉवडरच्या मार्केटिंगसाठी आलो आहेत. या कंपनीची जाहिरात करायला चालू आहे. असे बोलून घरातील महिलांना पहिल्यांदा एक पैंजन आणि पितळी तांब्या पॉलिश करून दाखवला. त्यानंतर सोन्याचे दागिणे पण आम्ही पॉलिश करुन देतो. असे सांगून घरातील तुकाराम कांबळे यांची मुलगी आरती भाग्यवंत (वय २५) आणि त्यांच्या पत्नी साधना कांबळे (वय ४५) यांना घरातील सोने आणण्यास भाग पाडले. त्यावेळी कांबळे कुटुंबीयांनी दोन घंटन, दोन आंगठ्या, एक कानातील साखळी असा ऐवज त्यांच्या ताब्यात दिला.

चोरट्यांनी घरातील हळद मागवून आपल्याकडे असणारी पावडर मिक्स करून आरती आणि साधना यांना उकळत्या पाण्यात टाकायला सांगितल्या. त्यावेळी दुसऱ्या साथीदाराने सही करायला आरतीला बोलवले. त्यावेळी दुस-या चोरट्याने सोन्याची चोरी केली होती. पण पाण्यात हळद घातली असल्यामुळे पाण्यात काही दिसत नव्हते. त्यावेळी त्या चोरट्यांनी दहा मिनिटांनी सोने काढून घ्या, असे सांगून पैसे न घेता चटकन निघून गेले.सुमारे दहा मिनिटांनी साधना यांनी भांड्यामध्ये पाहिले असता भांड्यात काहीच सापडले नसल्याने आपण फसलो आहोत हे लक्षात आले आणि आरडाओरड चालू केली. तोपर्यत चोरट्यांनी पोबारा केला होता.

कांबळे यांनी गडहिंग्लज पोलिसांना कल्पना दिल्यानंतर पोलीसांचे पथक आजरा, उत्तुर, कडवाग आदी ठिकाणी जाऊन आले पण हे चोरटे सापडले नाहीत. हे चोरटे आज सकाळपासूनच गिजवणेमध्ये सुमारे दहा पेक्षा जास्त लोकांच्या घरात जाऊन आले होते. पण शेवटी कांबळे कूटूंबीय त्यांच्या जाळ्यात फसले अन् साडे चार तोळे सोने गमवून बसले. अद्याप या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीसांत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!