News Flash

मोदी सरकारने जनतेला धोका दिला : आण्णा हजारे

राळेगणसिद्धी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नांठकडे दुर्लक्ष आणि लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कमकुवत करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने जनतेला धोका दिला आहे. गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला असून, सत्तेसाठी प्रत्येक पक्ष कोणत्याही थराला जात आहे. सत्तेतून पैसा आण पैशातून सत्ता, अशी स्पर्धा सुरू आहे. सध्याचे सरकार देशात हुकूमशाही आणतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आज पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

हजारे यांनी पत्रकात म्हटंले आहे की, सरकारी तिजोरीची राजरोस लूट सुरू आहे. गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत आहे. सत्ता आणि पैशांच्या नशेत राजकारणी आंधळे झाले आहेत. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. त्यामुळे ज्या भारतीयांना हा देश आपला आहे असे वाटते, त्यांनी दिवसातील एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत. अशा लोकांनी संघटित होणे गरजेचे आहे. आपण आता देश वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत. पण आताचे सत्ताधीश देशात हुकूमशाही आणतील.

शिवाय देशासाठी समान विचारधारेच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जो देशाचा व समाजाचा विचार करतो, ज्याचे जीवन आणि चारित्र्य शुद्ध आहे, देशासाठी त्यागाची तयारी आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन संघटन करावे. तसेच २३ मार्च दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हजारे यांनी पत्रकात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!