News Flash

बारावी पेपरफुटीचा अहवाल सादर करा : बबन दहिफळे

पुणे (प्रतिनिधी) : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अॅंपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल लगेच देण्याच्या सूचना पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली आहे.

बारावीची प्रश्नपत्रिका व्हायरल करून कॉपी करण्यासाठी व्हॉट्स अॅदपचा उपयोग केला जातो. वसंत महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतरही इंग्रजीच्या पेपरमधील उत्तरे लिहून ती पेपर देत असलेल्या विद्यार्थ्यांना पुरविली जात असल्याचे आढळून दिसून आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहावी-बारावीचा पेपर सुरू असतानाच व्हॉट्स अॅनपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.

परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. पण पेपरफुटी रोखण्यासाठी मंडळाने कडक उपाययोजना करूनही पेपर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!