News Flash

तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा आज उलघडला पडदा…

कोल्हापूर (प्रनिनिधी) : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवास आज (बुधवार) प्रारंभ झाला. या बालमहोत्सवाचे उद्घाटन विद्यार्थिनीच्या हस्ते पतंगाच्या प्रतिकृतीचे अनावरण करुन अनोख्या पध्दतीने करण्यात आले. यावेळी अभिनेते सागर तळाशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

चिल्लर पार्टीच्या वतीने महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवले जातात. या महोत्सवात आज दिल्ली सफारी, रॅटेट्युअल, अॅडव्हेनचर ऑफ टिनटिन हे तीन चित्रपट दाखवण्यात आले. या महोत्सवाचा महानगरपालिकेच्या ६० शाळांतील विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. त्याचबरोबर या शाळांमधील निवडक ५०० विद्यार्थ्यांनी पतंगावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवात भरविण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बीएफजी बोल्ट, द नट जॉब असे तीन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रशासकिय अधिकारी विश्वास सुतार हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ समितीच्या सभापती वनिता देठे, प्रशासन अधिकारी विश्वास सुतार, चिल्लर पार्टीचे समन्वयक मिलिंद यादव, अभय बकरे, सचिन पाटील, रविंद्र शिंदे, नसीम यादव, समीक्षा फराकटे, गुलाबराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!