News Flash

शाहु स्मारकभवन येथे २३ फेब्रुवारीपासून ‘चला पर्यटनाला’ छायाचित्रांचे प्रदर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी ५० अशा पर्यटनस्थळांच्या १५० छायाचित्रांचे ‘ चला पर्यटनाला ’ हे प्रदर्शन येथील शाहु स्मारक भवन येथे २३ ते २५ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते शुक्रवार (दि.२३) सकाळी १० वाजता होणार आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजीत केले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक पर्यटन स्थळांच्या छायाचित्राचे ‘ चला पर्यटनाला ’ हे छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. ‘ऐतिहासिक कोल्हापूर’, ‘सांगली, बहु चांगली’ तर ‘रमणीय सिंधुदुर्ग’ अशी थीम असलेल्या या ‘चला पर्यटनाला’ या कोल्हापूर विभागीय स्तरावरील प्रदर्शनामध्ये तिन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी ५० निवडक ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग व पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे.

या प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राचे अनुरुप शब्दात वर्णन करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गची चित्रमय सफर करायला, कोल्हापूर वासियांनी यावे. असे आवाहन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!