News Flash

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसाठी ध्येयाचा पाठपुरावा करावा : डॉ.डी.आर.मोरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नियोजनबध्द परिश्रम, सातत्य, चिकाटी, विद्यार्थ्याने अंगिकारुन आत्मनिर्भयपणे ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे. केवळ स्वप्न पाहून स्वस्थ बसू नये, तर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे अॅेकॅडमिक अॅडव्हायझर डॉ.डी.आर.मोरे यांनी केले. ते आज (बुधवार) श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाउस संचलित न्यू कॉलेजच्या वार्षिक गुणगौरव वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी मोरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेसाठी स्पर्धा होणे काळाची गरज असताना, आज मात्र व्यावसायिक स्पर्धा जोमाने वाढीला लागली आहे. ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाची चिंताजनक गोष्ट आहे. शिक्षणाचे व्यापारी, ख़ाजगीकरण रोखण्यासाठी वेळीच शिक्षण चळवळी उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील म्हणाले की, गुणवत्ता, आत्मनिर्भरता, विकास, बांधिलकी ही शिक्षणाची चतु:सूत्री आहेत. विद्यार्थ्यानी त्यांचा अवलंब करावा. गुणवत्तेच्या जोरावर अनेक नोकरीच्या संधी आपोआप चालून येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच विद्यापीठ, आंतरविद्यापीठ स्तरांवर यश संपादन केलेल्या खेळाडू, यशवंत विद्यार्थ्याचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक ए.जी.वणिरे, प्राचार्य डॉ.पी.के.पाटील, आर.बी.खोडवे, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, महाविद्यालयाचा सेवकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!