News Flash

अयोध्या रेल्वे स्थानकाचे बांधकाम राम मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे…

अयोध्या (वृत्तसंस्था) : अयोध्या रेल्वे स्थानक राम मंदिराच्या आराखड्याप्रमाणे बांधणार असल्याची घोषणा रेल्वेचे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेने १९८० मध्ये हा आराखडा तयार केला होता. या स्थानकाचे काल (मंगळवारी) भूमिपूजन झाले, त्या वेळी ही घोषणा करण्यात आली.
राममंदिराचा वाद सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे कितीही इच्छा असली, तरी मंदिर बांधता येत नाहीये. अयोध्येला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. त्यामुळे या स्थानकात येणाऱ्या प्रवाशाला आपण श्रीरामाच्या नगरीत आलो आहे, हे समजले पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची इच्छा आहे. त्यामुळे हे स्थानक विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिराच्या आराखड्याप्रमाणेच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकात लिफ्ट, सरकते जिने अशा सर्व आधुनिक सोयी-सुविधा असतील. या मंदिरासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे स्थानक बांधण्यासाठी ८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या स्थानकाचे काम २०२२ पर्यंत या स्थानकाचे पूर्ण होणार आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अयोध्या रेल्वे स्थानक राम मंदिराच्या प्रतिकृतीत तयार करण्याचा विषय समोर आला होता. मात्र आता हे काम पूर्ण होणार आहे, असे या वेळी भाजपचे खासदार विनय कटियार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!