News Flash

राज्यातील नऊ साखर कारखान्यांना कोटीचे अनुदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : २०१४-१५ मध्ये राज्यात साखरेचे उत्पादन विक्रमी झाले होते. त्यावेळी देशातंर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कमालीचे घसरल्याने सरकारने प्रतिटन एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांनी सन २०१४-१५ मध्ये निर्यात केलेल्या साखरेच्या अनुदानापोटी एकुण एक कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. या निर्णयामुळे सरकारला दहा कोटी अनुदान द्यावे लागत होते. उर्वरित तीन कोटी अनुदान देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे़.

सर्वाधिक ३० लाख ३९ हजारांचे अनुदान अहमदनगर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याला मिळणार आहे. त्यापैकी एप्रिल ते जून २०१७ मध्ये सात कोटी अनुदान संबंधित कारखान्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये भाऊसाहेब थोरात (अहमदनगर) ३० लाख ३९ हजार ७४३, शंकरराव मोहिते-पाटील (सोलापूर) ६ लाख १० हजार ९३०,अगस्ती (अहमदनगर) २ लाख ५५ हजार ५०९, छत्रपती शाहू (कोल्हापूर) १ लाख २१ हजार ६५१, सह्याद्री (सातारा) ११ लाख ५१ हजार ४४२, तात्यासाहेब कोरे (कोल्हापूर) १४ लाख १५ हजार ०७६, पूर्णा (हिंगोली) ३ लाख ९ हजार ७९६, माणगंगा (सांगली) ५ लाख ५० हजार २८५, विठ्ठलराव शिंदे (सोलापूर) २३ लाख ४२ हजार ८१ या कारखान्यांना अनुदान मंजूर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!