News Flash

‘पीएनबी’तील घोटाळेबाजांना सोडणार नाही ; जेटलींचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय. दिल्लीत ‘असोसिएशन ऑफ डेव्हलपिंग फायनान्सिंग इन्स्टिट्युशन इन एशिया अॅण्ड पॅसिफिक’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात जेटली बोलत होते.
ऑडिटर्स, बँक व्यवस्थापन आणि बँकांवर नियंत्रण असलेल्या प्रमुख संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ‘ऑडिटर्स काय करत आहेत?’, असा थेट सवाल जेटली यांनी केला. अंतर्गत आणि बाहेरचे ऑडिटर्स बँकेतील गैरव्यवहार पकडू शकणार नसतील तर चार्टर्ड अकाउंटंटनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मला वाटते, असा चिमटा जेटली यांनी काढला. जेटली यांनी रिझर्व्ह बँकेलाही अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकांतील अनियमितता पकडली जावी, यासाठी कोणत्या प्रकारची नवीन प्रणाली आणता येईल, याचा विचार पर्यवेक्षण करणाऱ्या संस्थांनी करण्याची गरज असल्याचे जेटली म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!