News Flash

आता मोबाईल नंबर होणार १३ अंकी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोबाईलधारकांसाठी आता आपला स्वतःचाच नंबर लक्षात ठेवणे कठीण जाणार आहे. दहा अंकी नंबर लक्षात ठेवताना कसरत कारवाई लागते. आता तर आपला नंबर चक्क १३ अंकी होणार आहे. १ जुलै २०१८ नंतर मोबाईल नंबर आता १३ अंकी होणार आहे. दूरसंचार खात्याने याबाबतचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार बीएसएनएलने याबाबत तयारीही सुरु केली आहे.

दूरसंचार खात्यातील सूत्रांनुसार, मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत सुचविण्यात आले की, देशातील मोबाईलधारकांच्या संख्येत आता प्रचंड वाढ झाली असल्याने आता १० आकड्यांच्या सिरीजमध्ये नवे नंबर देता येणे अशक्य बनले आहे. यामुळे प्रथम १० हून अधिक अंकांच्या नंबरची सुरुवात करावी आणि नंतर टप्प्याटप्प्याने देशातील सर्व नंबर १३ अंकांचे करावेत. मोबाईल सेवा पुरविणाऱ्या सर्व कंपन्यांना याबाबत लवकरचा निर्देश देण्यात येणार आहेत. त्यांना त्याप्रमाणे आपली सिस्टीम अपडेट करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सध्याचे नंबर १३ आकडी करण्याच्या प्रक्रियेस १ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. हे सर्व नंबर्स ३१ डिसेंबरपर्यंत १३ आकडी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!