News Flash

नीरज पांडे यांचा ‘अय्यारी’ सिनेमा इंटरनेटवर लीक…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. हा सिनेमा लीक झाल्याच्या वृत्ताने या सिनेमाच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.’अय्यारी’ या नवीन सिनेमाची पायरेटेड कॉपी बनवत एका सरकारी बसमध्ये प्रवाशांना दाखवण्यात आला. अशा प्रकारे सिनेमाची पायरसी होत असल्याने ‘अय्यारी’ सिनेमाच्या टीमसाठी एक मोठा धक्का आहे. सिनेमाची पायरसी झाल्याने दिग्दर्शक नीरज पांडे खूपच नाराज झाले आहेत. त्यानंतर त्यांनी सरकार आणि नागरिकांना नो टू पायरसी असे म्हटले देखील आहे.

यावेळी दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये नीरज पांडे यांनी म्हटलं आहे की, इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसेसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी म्हटले की, ‘नो टू पायरसी’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!