News Flash

नीरव मोदीबरोबर फोटो काढताना प्रोटोकॉल नाही का ? : निलम गोऱ्हे

धुळे (प्रतिनिधी) : शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय. भाजपचे जे पोटात आहे तेच ओठावर असल्यामुळेच छिंदमसारखे लोक समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

तसेच दावोसमध्ये पंतप्रधांनाना नीरव मोदींसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण दयायला प्रॉटोकॉल कसा आडवा येतो ? असा खोचक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधक पंक्चर झालेत म्हणून सेना विरोधकाच्या भूमिकेत आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!