News Flash

पीएनबी घोटाळ्यात विपुल अंबानीसह ५ जणांना अटक

मुंबई (प्रतिनिधी) : पीएनबीला ११,३९४ कोटी रुपयांना फसवल्याच्या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरा नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल कंपनीचा मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) विपुल अंबानीसह ५ जणांना अटक केली. विपुल हा रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे.

विपुल अंबानी तीन वर्षांपासून नीरवच्या कंपनीत आहे. यासह नीरवच्या तीन कंपन्यांच्या ऑथोराइज्ड सिग्नेटरी कविता माणिकर, फायरस्टार ग्रुपचे सीनियर एक्झिक्युटिव्ह अर्जुन पाटील, नक्षत्र समूहाचे सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजलीचे मॅनेजर नितेन शाही यांनाही अटक झाली आहे. सीबीआयने आतापर्यंत एकूण ११ जणांना अटक केली आहे. यात ४ पीएनबीचे अधिकारी, एका निवृत्त डीजीएमचा समावेश आहे. तर सहाजण नीरव-मेहुलच्या कंपन्यांतील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!