News Flash

अभिनेता कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची आज स्थापना…

मदुराई (वृत्तसंस्था) : अभिनेता आणि दिग्दर्शक कमल हसनच्या राजकीय पक्षाची आज (बुधवार) स्थापना होणार आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खास आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी आज अरविदं केजरीवाल हे मदुराईमध्ये येणार आहेत. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून कमल हसन आणि अरविंद केजरीवालही भाषण करणार आहेत. आपल्या पक्षाचा उद्देश आणि मुद्दे काय असतील हे यावेळी कमल हसन स्पष्ट करतील. तसचं पक्षाच्या झेंड्यांचही अनावरण होणार आहे.

तसेच एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी ट्विटरवरून जनतेला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. त्यापूर्वी आज कमल हसन यांनी रामेश्वरमध्ये जाऊन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या घरी जाऊन कलाम यांना श्रद्धांजली वाहत, कलाम यांच्या कुटुंबियाशी बातचीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!