News Flash

सातवीच्या विद्यार्थ्याने दिली शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी…

गुरुग्राम (वृत्तंसस्था) : गुरूग्राममधील एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला आणि त्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या प्रकरणानंतर त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले असून त्याचे कौन्सिलिंग करण्यात येणार आहे. या प्रकाराचा त्या मुलीला जबर धक्का बसला असून ती शाळेत येण्यास घाबरत आहे.

शिक्षिकेला बलात्काराची धमकी देणारा विद्यार्थी आणि त्या शिक्षिकेची मुलगी सातवीच्या एकाच वर्गात शिकत होते. काही दिवसांपूर्वी त्या विद्यार्थाचे शिक्षिकेच्या मुलीसोबत भांडण झाले होते. मुलीसोबत भांडण केले म्हणून त्या शिक्षिका देखील त्याला ओरडल्या होत्या. त्याचाच राग मनात धरत या विद्यार्थ्याने सोशल मीडियावरून दोघींवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. हि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुख्यध्यापकांनी तात्काळ त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शाळेने त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

याच शाळेत गेल्या आठवड्यात एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला इमेल पाठवून त्याच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरला येण्याची विनंती करत तिच्याकडे सेक्सची मागणी केली होती. या विद्यार्थ्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्याचेही समुपदेशन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!